आई आज तुझा वाढदिवस... माझ्या जीवनातला
सर्वोच्च आनंदाचा क्षण,
या दिवसाच्या निमित्ताने चल वेचू यात आपण
आठवणींचे सांडलेले कण...
ती बदकामागे पळत सुटलेले मी आणि मागे
धावणारी आई,
डोळ्यात पाणी... पडेल आपलं लेकरू खेळता
खेळता या भयापायी…
शाळेची परीक्षा तापात दिलेली मी आणि मला
कडेवर नेणारी तू,
श्रमांचं सार्थक झालेलं पाहता तुझ्या
डोळ्यांतले आनंदाश्रू उतू…
प्रत्येक सुख-दुःखाला आपण एकमेकींना दिलेली
साथ,
माझ्या जीवनातला तू माझा कधीही न सोडलेला
हात…
आठवते मला माझी आई "औक्षवंत हो
बाळा" माझ्यासाठी लिहिताना,
आणि एखाद्या प्रथेसम रडणाऱ्या आपण दोघी, दर
वेळी सोबत ते वाचताना…
माझ्या शिक्षणासाठी आजवर हरेक निमिष तू
झटलीस,
नोकरीसाठी लांब पाठवताना मात्र जीव तोडून
रडलीस…
माझ्या आयुष्याचं सोनं करणारा तुजसम परीस
मला मिळाला ही देवाची कृपा…
खरं तर खरा देव कुठे कोण जाणे पण इतकं मात्र
नक्की - तूच माझा बाप्पा !!!
No comments:
Post a Comment